
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपची सर्वाधिक नाविन्यपूर्ण कंपन्यांची 2023 यादी प्रसिद्ध झाली आहे. जगातील टॉप-50 सर्वात नाविन्यपूर्ण कंपन्यांच्या यादीत टाटा समूहाच्या (TATA Group) नावाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या यादीत ही एकमेव भारतीय कंपनी आहे. टाटा समूह या यादीत 20 व्या क्रमांकावर आहे.
ही यादी दरवर्षी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपद्वारे प्रसिद्ध केली जाते. यात जगभरातील कंपन्यांची कामगिरी, त्यांची क्षमता आणि नाविन्य यासह इतर अनेक बाबी तपासल्या जातात आणि या आधारावर त्यांना यादीत स्थान दिले जाते.
आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple टॉप-50 मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एलोन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला दुसऱ्या स्थानावर आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉन आहे.