Afghanistan Taliban Crisis : तालिबानी काबुलमध्ये, सर्व सीमांवर ताबा... अफगाणिस्तानमध्ये नेमकं घडतंय काय?

Afghanistan Taliban Crisis : तालिबानी काबुलमध्ये, सर्व सीमांवर ताबा... अफगाणिस्तानमध्ये नेमकं घडतंय काय?

दिल्ली | Delhi

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये (afghanistan news) तालिबान्यांनी (Afghanistan Taliban Crisis) हाहाकार माजवला आहे. मागील अनेक आठवड्यांपासून सुरू असलेला अफगाणिस्तानातील (Afghanistan) संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोचला आहे. तालिबानी (Taliban) आता अफगाणिस्तानची राजधानी काबूलपर्यत (Kabul) (Kabul)येऊन पोचले आहेत. काबूल शहराला तालिबान्यांचा वेढा आहे. काबूलच्या बाहेर तालिबानी सैन्य तैनात आहे आणि ते कधीही काबूल आणि अफगाणिस्तानची सत्ता हाती घेऊ शकते.

तालिबानी आणि अफगाणिस्तान लष्कर (Taliban and Afghanistan Army) यांच्यात आतापर्यंत या भागात कोणतेही युद्ध सुरू झालेले नाही. तालिबान्यांनी म्हटले आहे की ते शांततेने सत्ता हातात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करू इच्छितात. या सर्व सत्तांतरात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला इजा पोचवली जाणार नाही. ते शांततेने काबूल आणि अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करू इच्छितात.

यापूर्वी शनिवारी तालिबाननं जलालाबादवर (Jalalabad) ताबा मिळवला होता. यानंतर काबुल (Kabul news) शहरच उरलं होतं. काबुल (Kabul Update) हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानलं जातं होतं. मात्र आता या शहरावरही तालिबानने कुच केली आहे. जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबुलला देशाच्या पूर्व भागापासून वेगळं केलं होतं. जलालाबादच्या राज्यपालांना कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केलं होतं. सामान्य नागरिकांचं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी असं केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com