अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे वर्चस्व; २४ तासांत तीन शहरांवर ताबा

Taliban claim to capture Kandahar, Afghanistan's second-largest city
Taliban claim to capture Kandahar, Afghanistan's second-largest city

दिल्ली | Delhi

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानी (Taliban) आणि अफगाण (Afghan) सैन्य यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या (American army) माघारीनंतर तालिबानने आता आपला जोर वाढावला आहे.

तालिबानी आक्रमक होत असून अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणांवर ताबा मिळवत आहेत. तालिब्यान्यांकडून अफगाणिस्तान मध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू असून शुक्रवारी कंदहार (Kandahar) त्यांनी मिळवला आहे. काबूल (Kabul) नंतर कंदहार हे अफगाणिस्तान (Afghanistan) मधील सर्वात मोठं शहर आहे.

तालिबानने मागील काही दिवसात ११ राज्यांच्या राजधान्यांवर ताबा मिळवला आहे. हेरात, गझनी, कंदहार या महत्त्वाच्या शहरांवरही तालिबानने आपला झेंडा फडकवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तालिबान काबूलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. (Taliban claim to capture Kandahar, Afghanistan's second-largest city)

दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानचा वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर इथे हवाई हल्ल्यांत पुढाकार न घेण्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. हे युद्ध अफगाणिस्तानने जिंकावे वा हरावे अशा पद्धतीने आम्ही याकडे बघत असल्याचे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे. मात्र आम्ही त्यांना सहकार्य करत राहू असेही पेंटागॉनने म्हटले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com