दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड

दिल्ली | Delhi

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

स्वाती मालीवाल यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. "काही वेळापूर्वीच माझ्या घरावर हल्ला झाला. हल्लेखोर घराच्या परिसरात आला आणि त्याने हल्ला केला. हल्लेखोराने माझी आणि माझ्या आईच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्याने घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने त्यावेळी आम्ही घरात नव्हतो. नाही तर काय झालं असतं सांगता येत नाही. काहीही करा. मी घाबरणार नाही. दिल्ली पोलिसांकडे तक्रार करत आहे," असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वाती मालीवाल यांनी सांगितले होते की, त्यांना सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या येत आहेत. याबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की, जेव्हापासून त्यांनी चित्रपट निर्माता आणि बिग बॉस स्पर्धक साजिद खानविरोधात आवाज उठवला आहे, तेव्हापासून त्यांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमक्या दिल्या जात आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com