इंदौर सलग पाचव्यांदा ठरलं सर्वात स्वच्छ शहर; महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला जल्लोष, पाहा VIDEO

इंदौर सलग पाचव्यांदा ठरलं सर्वात स्वच्छ शहर; महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला जल्लोष, पाहा VIDEO

दिल्ली l Delhi

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 (Swachh Survekshan 2021) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते स्वच्छ शहरांना प्रदान करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातल्या इंदौर (Indore) शहराने सलग पाचव्या वर्षी देशातलं सर्वांत स्वच्छ शहर (Cleanest City in India) बनण्याचा मान मिळवला आहे. गुजरातमधलं सुरत (Surat) शहर दुसरं, तर आंध्र प्रदेशातलं विजयवाडा (Vijayawada) शहर देशातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वांत स्वच्छ शहर ठरलं आहे. या वर्षी पहिल्या तीन क्रमांकांत महाराष्ट्रातल्या शहराचा समावेश नाही. वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात यूपीच्या वाराणसीला सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या श्रेणीत प्रथम स्थान मिळाले आहे.

दरम्यान इंदौर शहराने सलग पाचव्या वर्षी हा बहुमान मिळवल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाचत आनंदोत्सव साजरा केला. तसेच शिवराज सिंह यांची ट्विट केले आहे की, 'वाह भिया! छा गया अपना इंदौर...' असे ट्विट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तसेच गेल्या वर्षी नवी मुंबई हे देशातलं तिसरं सर्वांत स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तसंच, गेली सलग पाच वर्षं नवी मुंबईने (Navi Mumbai) महाराष्ट्रातलं सर्वांत स्वच्छ शहर हा आपला किताब कायम राखला आहे; मात्र यंदा देशपातळीवरच्या स्वच्छ शहरांच्या पहिल्या तीन क्रमांकांमध्ये नवी मुंबईला स्थान मिळालेलं नाही.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राचाही गौरव करण्यात आला आहे. १ लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील पहिले सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर ठरले आहे ते म्हणजे विटा (सांगली). १ लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील सर्वोत्कृष्ट दुसरे शहर म्हणजे लोणावळा. १ लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील सर्वोत्कृष्ट तिसरे शहर म्हणजे सासवड. देशात स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र अव्वल असल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील ३ शहरांनी पुरस्कार पटकवला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com