अबूधाबी विमानतळावरील ड्रोन हल्लात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू

अबूधाबी विमानतळावरील ड्रोन हल्लात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) एक मोठा हल्ला झाल्याचं वृत्त आहे. अबुधाबीच्या नव्या विमानतळावर सोमवारी हा हल्ला झाला असून तो ड्रोनमधून (Drone Attacks)करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. इराणमधील हैती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या ड्रोन हल्ल्यांमध्ये (Drone Attack) एकूण तिघांचा मृत्यू (Three Dead) झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी दोघे भारतीय (Two Indians) नागरिक तर एक पाकिस्तानी नागरिक (1 Pakistani national) असल्याची माहिती आहे.

अबूधाबी विमानतळावरील ड्रोन हल्लात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू
Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले...कोणी राजे आलेत का?

संयुक्त अरब अमिरातकडून या घटनेचा तपास सुरू करण्यापूर्वीच इराण समर्थित 'हुती' बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेकडून भविष्यातही यूएईवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) च्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये हे स्फोट झाले. टँकरनं पेट घेण्यापूर्वी ड्रोनसारखी आकृती दिसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झालं

Related Stories

No stories found.