घरात मास्क घालणे दुर्दैवी; केंद्राला फटकारले

घरात मास्क घालणे दुर्दैवी; केंद्राला फटकारले

नवी दिल्ली | New Delhi

वायूप्रदूषणामुळे (Air Pollution) दिल्लीतील (Delhi) परिस्थिती गंभीर होत आहे. दिल्ली दिवसेंदिवस गॅस चेंबर बनत चालली आहे. ‘वायूप्रदूषणाचा धोका पाहता’ या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला (Central Government) फटकारले आहे...

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, प्रदूषणासाठी शेतकऱ्यांना शिव्या देणे ही एक फॅशनच झालेली आहे. प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊनची (Lockdown) सूचनादेखील न्यायालयाने दिली आहे. देशाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण (N. V. ramana) यांनी केंद्राला सांगितले की, वायू प्रदूषण ही एक गंभीर स्थिती आहे. आम्हाला घरीदेखील मास्क लावावे लागतात.

वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी काय पावले उचलली? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. दोन लाख यंत्रे शेतातील खुंट जाळण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच बाजारात दोन तीन प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत. पण शेतकरी ती खरेदी करू शकत नाहीत. केंद्र, राज्य सरकारे शेतकऱ्यांना ही यंत्रे देऊन परत घेऊ शकत नाहीत का? असा सवालही सुप्रीम कोर्टाने केला.

लोक कसे जगतील?

आम्हाला सांगा की आपण हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५०० वरून किमान २०० अंकापर्यंत कसा कमी करू शकतो. काही आवश्यक उपाययोजना करा. तुम्ही दोन दिवसांच्या लॉकडाऊनचा किंवा कशाचाही विचार करू शकता? लोक कसे जगतील? असे सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केले आहे.

दिल्लीतील वायू प्रदूषणावरील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, लहान मुलांना या मोसमात शाळेत जावे लागते. आपण त्यांना धोक्यात घालत आहोत. देशाच्या राजधानीत तुम्ही सर्व शाळा उघडल्या आहेत आणि आता मुलांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com