करोना संपवण्यासाठी 'या' खासदारांचा अजब सल्ला !

नेटकऱ्यानी उडवली खिल्ली
करोना संपवण्यासाठी 'या' खासदारांचा अजब सल्ला !

भोपाळ | Bhopal

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी करोना बाबत अजब दावा केला आहे. या दाव्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. करोनावर मात करण्यासाठी हनुमान चालिसाचे वाचन करण्याचा अजब दावा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी ट्विटद्वारे हा अजब दावा केला आहे. त्यात त्यांनी व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे, " भोपाळमध्ये लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेतच, मात्र कोरोनाच्या या संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी आता आध्यात्मिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी ७ वाजता हनुमान चालिसाचे वाचन पाच वेळा केल्यास देशातील करोना नष्ट होऊन जाईल."

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com