भारताचे ‘स्टिल मॅन’ जेजे इराणी यांचं निधन

भारताचे ‘स्टिल मॅन’ जेजे इराणी यांचं निधन

मुंबई | Mumbai

स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी (Jamshed J Irani) यांचे सोमवारी रात्री जमशेदपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती टाटा स्टीलकडून देण्यात आली आहे.

ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डेजी ईराणी, मुलं जुबिन, निलोफर आणि तनाज आदी आहेत. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगतातील भीष्म पितामह हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून जेजे इराणी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी १९५६ मध्ये नागपुरमधून विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर १९५८ मध्ये नागूपर विद्यापीठातून त्यांनी एमएससी पूर्ण केले.

यानंतर ते जेएन टाटा स्कॉलर म्हणून ब्रिटन यूनिवर्सिटी ऑफ शेफील्ड येथे गेले आणि १९६० मध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. याशिवाय १९६३ मध्ये त्यांची पीएचडी पूर्ण झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com