भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन Starbucks चे नवे सीईओ

भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन Starbucks चे नवे सीईओ

मुंबई | Mumbai

भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॉफीचा जगप्रसिध्द ब्रँड स्टारबक्सच्या सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन (Laxman Narasimhan) यांची निवड केली आहे.

नरसिंहन १ ऑक्टोबरपासून स्टारबक्समध्ये रुजू होतील आणि पुढील वर्षी कंपनीचे सध्याचे सीईओ हॉवर्ड शुल्झ यांची जागा घेतील. नरसिंहन पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. नरसिंहन सध्या आरोग्य आणि स्वच्छता कंपनी रेकिटचे (Reckitt) प्रमुख आहेत.

जागतिक स्तरावर भारतीय सीईओंचा डंका वाजला आहे. अनेक मोठी नावे आज जागतिकस्तरावर गाजत आहेत. त्यात आता नरसिंहन यांचे नाव जोडल्या गेले आहे. नरसिंहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com