Sri Lanka’s New President : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

Sri Lanka’s New President : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

दिल्ली | Delhi

श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी पलायन करून राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) हे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

श्रीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत. मागील ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

२२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांना १३४ मतं मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com