श्रीलंकेत पुन्हा महिंदा राजपक्षे सरकार
देश-विदेश

श्रीलंकेत पुन्हा महिंदा राजपक्षे सरकार

श्रीलंका पीपल्स पार्टीचा विजय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

कोलंबो |Colombo -

श्रीलंकेत पुन्हा एकदा पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला बहुमत मिळाले आहे. 225 जागांपैकी एकट्या श्रीलंका पीपल्स पार्टीने 145 जागांवर विजय मिळवला तर सहकारी पक्षांसोबत त्यांचा एकूण 150 जागांवर विजय झाला आहे. पक्षाला एकूण 59.9 टक्के मते मिळाली. Sri Lanka Election Results 2020

या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजपक्षे यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम केले जाणार असल्याचेही मोदी यांनी सांगितले. तर अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. भारत व श्रीलंका यांच्यात अनेक वर्षांपासून असलेले उत्तम संबंध आणि सहकार्य अधिक बळकट करण्यास एकत्र काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. दोन्ही देश हे चांगले मित्र आणि उत्तम सहकारी आहेत, असे ट्विट राजपक्षे यांनी केले.

महिंद्रा राजपक्षे यापूर्वी 10 वर्षे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षही होते. परंतु, पक्षातील विरोधामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. परंतु, त्यानंतर त्यांचे बंधू राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. यावर्षी निवडणुकीपूर्वी श्रीलंका पोदुजना पार्टीने (एसएलपीपी) संविधानात बदल करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. यात पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ वाढवणे, देशातील काही कायद्यांमध्ये बदल करणे आणि अन्य बाबींचा समावेश होता.

राजपक्षे चीन समर्थक - राजपक्षे हे आपल्या मागील कार्यकाळात चीन समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या विचारांमध्ये आणि धोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ते पुढेही तसेच राहतील, असे मत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक डॉ. रहिस सिंह यांनी व्यक्त केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com