SpiceJet चा प्रवास महागणार; वाचा सविस्तर

SpiceJet चा प्रवास महागणार; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

विमानाने (air plane) प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. रुपयाचे घटलेले मूल्य आणि एव्हिएशन इंधनाच्या (Aviation fuel) किंमती वाढल्यामुळे आता विमानाचे तिकीटही (Tickets) वाढणार आहे...

इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे (Fuel Price Hike) आमच्याकडे विमानाच्या तिकिटाचे भाडे वाढविण्याखेरीज पर्याय नाही. हवाई भाड्यात किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढ करण्याची गरज असल्याची माहिती स्पाईसजेटचे (SpiceJet) चेअरमन आणि एमडी अजय सिंह (Ajay Singh) यांनी दिली आहे.

SpiceJet चा प्रवास महागणार; वाचा सविस्तर
Visual Story : जेव्हा सुशांत सिंह राजपूतने बाऊन्सरवर उत्तुंग षटकार खेचला; मास्टर ब्लास्टरही झाला होता फिदा

ते पुढे म्हणाले की, एटीएफच्या किंमतीत जून २०२१ पासून सुमारे १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एटीएफवरील कर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने (Central and State Government) तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

SpiceJet चा प्रवास महागणार; वाचा सविस्तर
नोकियाचा 'हा' फोन 'स्मार्ट' बाजारात करणार धमाका

गेल्या काही महिन्यात स्पाईसजेट (SpiceJet) कंपनीने इंधनाच्या किंमतीवरील वाढीचा जास्तीत जास्त भार उचलण्याचा प्रयत्न केला आहे. जो ऑपरेशन खर्चाच्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. अमेरिकन डॉलरच्या (USD) तुलनेत भारतीय रुपयाच्या (Indian Rupees) कमतरतेचा परिणाम एअरलाईन्सवर झाला आहे.

आता पुन्हा एकदा एटीएफच्या किमतीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आजपासून एटीएफची किंमत १९७५७.१३ रुपये प्रति किलो लिटरने वाढून १४१२३२.८७ रुपये प्रति किलो लिटरपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आता विमान प्रवास महागणार आहे, असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com