कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपतींची लष्करी रुग्णालयास खास भेट
देश-विदेश

कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपतींची लष्करी रुग्णालयास खास भेट

करोना योद्धांचे मनोबल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला

Nilesh Jadhav

नवी दिल्ली | New Delhi

राष्ट्रपती रामनाथ कोविंद President Ramnath Kovind यांनी आज कारगिल विजय दिवसानिमित्त भारतीय लष्कराच्या आर अँड आर R&R या हॉस्पिटलला उपकरणे खरेदी करण्यासाठी 20 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

या पैशाचा उपयोग करोना योद्धांसाठी corona warriors हवा साफ करणारे उपकरणे खरेदी करण्यासाठी केला जाईल. सैन्य दलाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी रुग्णालयातील करोना योद्धांचे मनोबल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

कारगिल युद्धामध्ये शौर्याने लढलेल्या आणि शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रपतींनी उपकरणे खरेदी करण्यासाठी लष्करी रुग्णालयात 20 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com