पीएम केअर फंडातून देशभरात लवकरच 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

पीएम केअर फंडातून देशभरात लवकरच 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

नवी दिल्ली -

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे.

ही गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारनं पीएम केअर फंडातून, 551 पिएसए वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारायला निधी पुरवण्यासाठी, सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये हे प्रकल्प उभारले जातील. राज्यात, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर यासह एकूण 34 जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असतील. हे सर्व प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करावेत असे निर्देशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com