लडाखमधील शहीदांना सोनिया गांधींकडून श्रद्धांजली

केंद्र सरकारवर टीका
लडाखमधील शहीदांना सोनिया गांधींकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली - लडाखच्या गलवान खोर्‍यात पुर्वेकडील नियंत्रण रेषेवरील गलवान खोर्‍यात झालेल्या भारत-चीन संघर्षाला आज (15 जून) 1 वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी 15 जूनला चीनी सौनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनच्या जवानांनाही ठार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्र सरकारने जनतेला विश्‍वासात घेऊन या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली पाहिजे असे मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले आहे. भारत-चीन संघर्षाला 1 वर्षांचा कालावधी पुर्ण झाला तरी केंद्र सरकारने अधिकृत कोणतीही माहिती दिली नसल्यामुळे काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

सोनिया गांधी यांनी निवेदनात म्हटले आहे, गलवान खोर्‍यात 14-15 जूनच्या रात्रीत घडलेल्या घटनेबद्दल काँग्रेस दुःखी आणि अस्वस्थ आहे. चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये बिहार रेजिमेंटचे 20 जवान शहिद झाले आहेत. या जवानांनी दिलेल्या बलिदानासाठी सर्व देश आभारी आहे. देशाने तसेच काँग्रेस पार्टीने वाट पाहते आहे की, कधी सरकार गलवान खोर्‍यातील घटनेबाबत सांगेल. गलवान खोर्‍यातील हल्ला कोणत्या परिस्थितीमुळे आणि कशामुळे झाला आहे. तसेच सरकारने देशातील नागरिकांना आश्‍वासन द्यावे की गलवान खोर्‍यातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. केंद्र सरकारने कोणतेही स्पष्टीकरण न दिल्यामुळे काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे.

एक वर्षांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, कोणतेही उल्लंघन झाले नव्हते. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याबाबत वारंवार स्पष्टीकरण मागितले होते. गलवान खोर्‍यातील घटनेची माहितीही मागितली होती. असे सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने देशातील नागरिकांना विश्‍वासात घेऊन सांगावे की आपले जवान देशाच्या सीमेवर सुरक्षित आणि धैर्याने उभे आहेत.

लेहमधील स्मारकारवर पुष्पहार

अग्निशामक आणि फ्युरी जवानांच्या पथकाने हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कॉर्पोरेशन ऑफ चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आकाश कौशिक यांनी लेहमधील स्मारकारवर पुष्पहार अर्पण केला आहे. या स्मारकात गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या जवानांची नावे लिहिली आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com