सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजले, नंतर...; गोवा पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट

सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजले, नंतर...; गोवा पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट

गोवा | Goa

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी (Sonali Phogat Death Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोवा पोलिसांनी (Goa Police) केलेल्या तपासामध्ये सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

गोवा पोलिसांनी सांगितले की, सोनाली फोगटला यांना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते. सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर भावाच्या जबाबाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची चौकशी करण्यात आली. उपलब्ध पुराव्याच्या आधारे सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सोनालीसोबत पार्टी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे. सोनालीला बळजबरीने काहीतरी देण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सांगवानची चौकशी केली असता, त्याने सोनालीला जबरदस्तीने ड्रिंक्समध्ये अमली पदार्थ किंवा केमिकल मिसळून पाजल्याची कबुली दिली.

सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्युमागे काही कटकारस्थान असल्याचा संशय पहिल्या दिवसापासूनच येत होता. सोनाली फोगाट यांचे बंधू रिंकू ढाका यांनी गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये त्याने दोन जणांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्याबाबतची माहिती आता पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामध्ये सोनाली यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचे दिसून आले होते.

दरम्यान सोनाली फोगाट यांच्या मृतदेहावर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधरा आणि त्यांचा चुलत भाऊ यांनी एकत्रित त्यांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला. या वेळी सोनाली अमर रहे, सोनाली यांची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्यापूर्वी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सोनाली यांचे पार्थिव सिव्हिल रुग्णालयातून अंत्यदर्शनासाठी ढंढूप फार्महाऊसवर आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा ऋषीनगर स्मशानभूमीपर्यंत निघाली. यावेळी सोनाली यांची एकलुती एक मुलगी यशोधरा हिने त्यांच्या पार्थिव शरिराला खांदा दिला होता. सन्मान म्हणून सोनाली यांच्या पार्थिवावर भाजपाचा झेंडाही पांघरण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com