10 जून रोजी दिसणार सूर्यग्रहण

10 जून रोजी दिसणार सूर्यग्रहण

नवी दिल्ली - येत्या 10 जून रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे. काही भागांमध्ये कंकणाकृती ग्रहण पाहता येणार आहे.

या काळात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येणार आहेत. या ग्रहणाच्या काळात कंकणाकृतीचा योग असल्याने अनेक देशांच्या खगोल शास्त्रज्ञांचे याकडे विशेष लक्ष लागले आहे. अनेक देशांमधून हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

युरोपचा बहुतांश भाग, आशिया, उत्तर अमेरिका, अ‍ॅटलांटिका यासारख्या प्रदेशांमधून अंशत: सूर्यग्रहण पाहता येणार आहे. पण, भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेशचा भाग वगळता देशातून इतरत्र कुठेही हे सूर्यग्रहण दिसणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com