...तर कोणत्याही व्हेरिएंटपासून होईल बचाव

डॉ. रणदीप गुलेरियांनी सांगितले उपाय
...तर कोणत्याही व्हेरिएंटपासून होईल बचाव

नवी दिल्ली / New Delhi - करोनाचा नवीन डेल्टा प्लस नावाचा विषाणमुळे चिंतेचे वातावरण निर्माण होते आहे. करोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. यातच आता करोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी उत्तम पद्धत दिल्लीतील एम्स प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS chief Dr. Randeep Guleria) यांनी सांगितली आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले, करोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, विशेषतः हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर राखणे, यांसारख्या उपायांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत, देशात करोनाचा नवा प्रकार डेल्टा व्हेरिएंटचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

देशभरातील 10 राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे (Delta Plus variant) रुग्ण आढळत आहेत. परंतु, आपण करोना प्रतिबंधाचे सर्व नियम योग्य पद्धतीने पाळले तर आपण कोणत्याही संभाव्य व्हेरिएंटपासून बचाव करू शकतो, असे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले आहे. डेल्टा व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो जास्त संसर्गजन्य आहे का, त्याच्यामुळे अधिक मृत्यू होत आहेत का, असे सांगता येणार नाही.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातील नागरिकांनी सुद्धा मास्क घालणे आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com