नवी दिल्ली -

देशात 2016-20 दरम्यान झालेल्या विविध निवडणुकांमध्ये सुमारे 170 काँग्रेस आमदारांनी पक्षाला सोठचिठ्ठी देत अन्य

पक्षात प्रवेेश केला आहे तर, भाजपाच्या 18 आमदारांनी या काळात इतर पक्षांकडून निवडणुका लढविल्या आहेत, अशी माहिती लोकशाही सुधारणांसाठी मतदान हक्क या समूहाने आपल्या अहवालात दिली आहे.

अहवालानुसार, 2016-20 काळात दुसर्यांदा निवडणूक लढविणार्या 405 आमदारांपैकी 182 आमदारांनी पक्षांतर करीत भाजपात प्रवेश केला, तर 38 आमदारांनी काँग्रेसची वाट धरली तसेच 25 आमदारांनी तेलंगणा राष्ट्रसमितीत प्रवेश केला. भाजपाच्या 5 खासदारांनी 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर केले होते. काँग्रेसच्या 7 राज्यसभा सदस्यांनी देखील 2016-20 काळात पक्षांतर करीत इतर पक्षांकडून निवडणूक लढविली होती. जवळपास 170 काँग्रेस आमदारांनी या काळात पक्षाला रामराम ठोकला. याचाच परिणाम म्हणून मध्यप्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल आणि कर्नाटकमधील काँग्रसचे सरकार कोसळले.

दुसर्यांदा निवडणूक लढविणार्या काँग्रेसच्या 16 राज्यसभा सदस्यांपैकी 10 सदस्यांनी तर लोकसभेच्या 12 खासदारांनी भाजपाची वाट धरली. मागील पाच वर्षांत 433 खासदार आणि आमदारांनी पक्षांतर करून निवडणूक लढविली आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.