New Covid Strain In Singapore : केजरीवालांच्या 'त्या' ट्विटला सिंगापूरच्या दूतावासाचे उत्तर

New Covid Strain In Singapore : केजरीवालांच्या 'त्या' ट्विटला सिंगापूरच्या दूतावासाचे उत्तर

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. तसेच वैज्ञानिकांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक ट्विट करत केंद्र सरकारचे एका मुद्द्याकडे लक्ष वेधले होते.

सिंगापूरमध्ये कोविडचा नवीन स्ट्रेन आढळून आला असून, तो लहान मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत आहे, असे म्हणत केजरीवालांनी सिंगापूरसोबतची हवाई वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांच्या ट्विटवर सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने ट्विट करून उत्तर दिले आहे.

New Covid Strain In Singapore : केजरीवालांच्या 'त्या' ट्विटला सिंगापूरच्या दूतावासाचे उत्तर
COVID19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मृत्यूतांडव मात्र कायम

केजरीवाल यांच्या ट्विटवर सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने ट्विट करून उत्तर दिले असून केजरीवाल यांचे ट्विट तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. भारतीय माध्यामांमध्ये कोविडचा नवा प्रकार स्ट्रेनवर एक रिपोर्ट छापण्यात आला होता. त्यात मुलांसाठी हा स्ट्रेन घातक आहे आणि भारतातील तिसऱ्या लाटेशी याचा संबंध जोडण्यात आला होता. या प्रकाराला सिंगापूर स्ट्रेन सांगण्यात आले होते. दरम्यान सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने हा दावा खोडला आहे.

'सिंगापूरमध्ये कोविडचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. गेल्या काही आठवड्यांमध्ये सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या मुलांसहित अनेक रुग्णांना बी.१.६१७.२ कोविड विषाणूंचा संसर्ग झाला आहे. फिलोजेनेटिक चाचणीतून हे सिद्ध झाले आहे. या विषाणूची निर्मिती भारतातच झालेली आहे,' असं सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट केलं होतं. 'सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात हा विषाणू तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, की, सिंगापूरसोबतची हवाई प्रवासी सेवा तत्काळ रद्द करण्यात यावी. लहान मुलांसाठी लसींच्या पर्यायांवर प्राधान्यक्रमाने काम करण्यात यावं,' असं केजरीवाल म्हणाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com