सिक्कीममध्ये हिमस्खलन, ६ पर्यटकांचा मृत्यू; ८० हून अधिक जण अडकल्याची भीती

सिक्कीममध्ये हिमस्खलन, ६ पर्यटकांचा मृत्यू; ८० हून अधिक जण अडकल्याची भीती

सिक्कीम | Sikkim

सिक्कीमचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या गंगटोकमध्ये मंगळवारी हिमस्खलन झाले. मंगळवारी दुपारी १२.२० च्या सुमारास गंगटोकला नाथुला पासशी जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर ही घटना घडली. यात ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून ८० हुन अधिक जण बर्फात अडकल्याची माहिती मिळत. मृतांमध्ये १ महिला व एका मुलासह इतर ४ पुरुषांचा समावेश आहे.

बर्फात अडकलेल्या २२ पर्यटकांची सुटका करण्यात आली. त्यांना गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रस्ता मोकळा केल्यानंतर अडकलेल्या ३५० पर्यटकांची आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com