
दिल्ली | Delhi
सिक्कीममध्ये (Sikkim) अचानक ढगफुटी (Cloud Burst) झाल्याने तीस्ता नदीला (Teesta River) पूर आला यामुळे भारतीय लष्कराचे (Indian Army Personnal) २३ जवान बेपत्ता झाले आहेत.
प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य (Search Operation) सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस (Sikkim Heavy Rain) सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क (Alert) राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सिक्कीममध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीची पाण्याची पातळी वाढली. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहणारी ही नदी बांगलादेशात जाते.
दरम्यान, सिक्कीम प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. तीस्ता नदीला आलेल्या या पुरामुळे सिक्किम मधील सिंगथम फुटब्रिज देखील वाहून गेला आहे. तसेच जलपाईगुडी प्रशासनाने तीस्ता नदीच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणे सुरू केले आहे. तसेच सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.