अहमदाबाद कोविड सेंटरला आग; 8 जणांचा मृत्यू
देश-विदेश

अहमदाबाद कोविड सेंटरला आग; 8 जणांचा मृत्यू

आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती

Nilesh Jadhav

अहमदाबाद | Ahmedabad

गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेल्या कोविड-१९ सेंटरला आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

अहमदाबादमधील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. आगीची माहिती समजताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून ४० जणांना यातून वाचवण्यात आले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com