धक्कादायक! देशातले 50 टक्के लोक मास्क वापरतच नाही

केंद्र सरकारची माहिती
धक्कादायक! देशातले 50 टक्के लोक मास्क वापरतच नाही

नवी दिल्ली - देशातले 50 टक्के लोक मास्क वापरतच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. केंद्र सरकारने एका सर्वेक्षण अहवालाच्या हवाल्याने ही आकडेवारी दिली आहे.

देशातले 50 टक्के लोक मास्क घालतात खरे पण त्यामध्ये देखील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तर्‍हा असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार, मास्क घालणार्‍यांपैकी 64 टक्के भारतीय मास्क तोंडावर घालतात. पण नाक उघडंच ठेवतात. त्यानंतर 20 टक्के भारतीय मास्क घालतात, पण तो तोंडावर नसून हनुवटीवर घालत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 2 टक्के भारतीय तर मास्क हनुवटीवरही न लावता थेट गळ्यावर ठेवतात.

फक्त 14 टक्के भारतीय योग्य प्रकारे मास्क घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मास्कद्वारे नाक, तोंड, हनुवटी झाकली गेलेली असते. नाकावर मास्कला क्लिप लावलेली असते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनासंदर्भात भारतातील योग्य ती माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही आकडेवारी पोस्ट करण्यात आली आहे. पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे 10 एप्रिल रोजीनुसार ही आकडेवारी तयार करण्यात आली असून देशभरातल्या 25 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी नमुना पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com