शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक ; काय आहे प्रकरण?

शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक ; काय आहे प्रकरण?

मुंबई / Mumbai - बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अश्‍लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या सहाय्याने रिलीज (प्रदर्शित) करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळं शिल्पा शेट्टीच्याही अडचणी वाढल्या आहेत. शिल्पाची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. आता शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक केल्याचे एक प्रकरण पुढे आले आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी मुंबईच्या जुहू पोलिस थानकात जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

सुनंदा शेट्टी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मे 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळाता रायगडच्या कर्जत परिसरात चार हेक्टर जमिनीबाबत सुधाकर घारे नामक व्यक्तिशी व्यवहार झाला होता. काही काळानंतर सुनंदा शेट्टी यांना अशी माहिती कळली की, या जमिनीची कागदपत्रं बोगस आहेत आणि यासाठी 1 कोटी 60 लाख रुपये सुनंदा शेट्टी यांनी दिले होते.

ज्यावेळी सुनंदा शेट्टी यांनी सुधाकरला याविषयी विचारलं त्यावेळी सुधाकरनं पैसे परत द्यायला नकार दिला. तसेच खोट्या केसमध्ये अडकण्याची धमकी दिली आणि सुनंदा यांना कोर्टात जा असंही म्हटलं.

यानंतर सुनंदा शेट्टी अंधेरी कोर्टात गेल्या. तिथं कोर्टानं त्यांचं प्रकरण ऐकलं आणि जुहू पोलिसांना या प्रकरणात एफआयआर दाखल करत चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी सुधाकर विरोधात 406, 409, 420, 462, 467, 468, 471, आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, याप्रकरण पोलिसांनी सांगितलं, कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही एफआयआर दाखल केली असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com