Shakti Mills Rape Case: 'त्या' तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण?
Shakti Mills Rape Case: 'त्या' तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

मुंबई l Mumbai

२०१३ मधील मुंबईसह सार्‍या देशाला सुन्न करणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी (Shakti Mill Gang Rape Case) आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे.

मुंबई सत्र न्यायालयानं ४ डिसेंबर २०१४ रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान न्यायालयानं ३ जून २०१९ मध्ये फेटाळून लावलं होतं. त्यानंतर ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव (Justice Sadhana Jadhav) आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण (Justice Prithviraj Chavan) यांच्या खंडपीठापुढे पार पडली.

दरम्यान आज निर्णय सुनावताना न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला. तसेच घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. (Shakti Mills gang-rape case 2013 Bombay High court sends three accused to life imprisonment)

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईतील (mumbai) महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे २२ ऑगस्ट २०१३ मध्ये एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली होती. त्यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या प्रकरणी विजय जाधव, मोहम्मद शेख उर्फ कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींनी या आगोदर ३१ जुलै २०१३ ला टेलिफोन ऑपरेटरवर सामूहिक बलात्कार केला होता, असे पोलीस तपासात समोर आले होते. हे तीनही आरोपी हॅबीच्युअल ओफेंडर ठरत असून ते समाजासाठी घातक आहेत, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com