नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना

नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना

नेवासा | तालुका प्रतिनिधी

नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवजाचा मसुदा तयार करण्यासाठी सुरेश प्रभू यांचे अध्यक्षतेखाली 47 सदस्य असलेली राष्ट्रीयस्तरावरील समितीची स्थापना करण्यात आली आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे अधिपत्याखाली केंद्रीय सहकार मंत्रालयाने याबाबदचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार सुरेश प्रभू यांचे अध्यक्षतेखालील समितीमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि प्राथमिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्य, केंद्राच्या सहकारी संस्थांचे सचिव, निबंधक आणि केंद्रीय मंत्रालये-विभागांचे अधिकारी यांचा ही समावेश असणार आहे. सहकार मंत्रालयाचे प्रतिनिधीत्व अतिरिक्त सहकार सचिव करतील.

'सहकारातून समृद्धी'ची संकल्पना साकार करण्यासाठी व देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी, सहकाराला चालना देण्यासाठी सक्षम फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी सहकार तत्त्वांच्या अनुषंगाने नवीन राष्ट्रीय सहकार धोरण दस्तऐवज तयार करण्यासाठी ही समिती जबाबदार असेल. सहकारावर आधारित आर्थिक विकास मॉडेल समिती तिच्या पहिल्या बैठकीच्या तारखेपासून ३ महिन्यांच्या आत अंतिम मसुदा केंद्र सरकारला सादर करेल.

...अशी आहे समिती

अध्यक्ष :

सुरेश प्रभाकर प्रभू (माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री)

सदस्य :

उमाकांत दाश (संचालक, ग्रामीण व्यवस्थापन संस्था), डॉ. एच. के. मिश्रा (प्राध्यापक, ग्रामीण व्यवस्थापन संस्था), डॉ. सुखपाल सिंग (प्राध्यापक, आयआयएम अहमदाबाद), सतीश मराठे, (संचालक, RBI सेंट्रल बोर्ड), डॉ. वाय. डोंगरे (कुलगुरू, चाणक्य विद्यापीठ, कर्नाटक), डी. कृष्णा (माजी सीईओ, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आणि पतसंस्था), डॉ. सी. पिचाई (प्राध्यापक आणि प्रमुख, सहकार विभाग, गांधीग्राम ग्रामीण संस्था, तामिळनाडू), संजीवकुमार चड्डा (माजी कार्यकारी संचालक, नाफेड), दिलीप संघानी (अध्यक्ष, NCUI आणि अध्यक्ष, IFFCO), ज्योतिंद्र मेहता (अध्यक्ष, NAFCUB), मनोजकुमार सेमवाल (कार्यकारी संचालक, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ), के.के. रवींद्रन (कार्यकारी संचालक, राष्ट्रीय सहकारी कृषी आणि ग्रामीण डेव्हलपमेंट बँक्स फेडरेशन लिमिटेड), रंजन चौधरी (कार्यकारी संचालक, KRIBHCO), कोंडुरू रविंदर राव (अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड), प्रकाश नाईकनवरे (कार्यकारी संचालक, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड), आर.एस. सोढी (कार्यकारी संचालक, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड) अध्यक्ष (तामिळनाडू हातमाग विणकर सहकारी संस्था, तामिळनाडू), अध्यक्ष (केरळ रबर आणि कृषी विपणन आणि प्रक्रिया सहकारी सोसायटी लि. केरळ), अध्यक्ष (मार्कफेड, पंजाब), अध्यक्ष (अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक लिमिटेड, अहमदाबाद, गुजरात), अध्यक्ष (भुटी विणकर सहकारी संस्था लि.,हिमाचल प्रदेश), अध्यक्ष (फलोत्पादन उत्पादक सहकारी पणन व प्रक्रिया संस्था, कामटक), अध्यक्ष (करीमनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, तेलंगणा), अध्यक्ष (डेहराडून दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादित, उत्तराखंड), अध्यक्ष (मुल्लाना प्राथमिक कृषी सहकारी संस्था लि.,अंबाला हरियाणा),अध्यक्ष (मुल्कनूर सहकारी ग्रामीण पत व विपणन संस्था लिमिटेड,तेलंगणा), अध्यक्ष (टी.नरसापूर प्राथमिक सहकारी संस्था, आंध्र प्रदेश), अध्यक्ष, (दीनदयाल बहुउद्देशीय सहकारी संस्था, गोवा), अध्यक्ष (करम अवांग लीकाई हातमाग आणि हस्तकला सहकारी संस्था, पश्चिम इंफाळ, मणिपूर), अध्यक्ष (द सॅंडहोल अॅग्री सर्व्हिस कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., हिमाचल प्रदेश), अध्यक्ष (थिमिरी सर्व्हिस को-ऑपरेटिव्ह बँक लि. केरळ), प्रधान सचिव, सहकार, (उत्तर प्रदेश सरकार), अपर मुख्य सचिव, सहकार (महाराष्ट्र शासन), सचिव, सहकार, (तामिळनाडू सरकार), प्रधान सचिव, सहकार (कर्नाटक सरकार), अतिरिक्त मुख्य सचिव, सहकार, (आसाम सरकार), सहकारी संस्थांचे निबंधक(बिहार सरकार), सहकारी संस्थांचे निबंधक (ओडिशा सरकार), सहकारी संस्थांचे निबंधक( तेलंगणा सरकार) ,सहकारी संस्थांचे निबंधक, (केरळ सरकार), सहकारी संस्थांचे निबंधक, (पश्चिम बंगाल सरकार), सहसचिव, वित्तीय सेवा विभाग, (केंद्रीय वित्त मंत्रालय), सहसचिव, (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय), पोखरणसहसचिव, (केंद्रीयअन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण), ​​सहसचिव, मत्स्यव्यवसाय विभाग, (मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय), सहसचिव, ग्रामीण विकास विभाग, (केंद्रीयग्रामीण विकास मंत्रालय).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com