सिरम इन्स्टिट्युट लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार

सीरम इन्स्टिट्युटने मंगळवारी केली घोषणा
सिरम इन्स्टिट्युट लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार

पुणे -

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था कोव्हिड-19 म्हणजेच करोनाला प्रतिबंध करणार्‍या लशीचे

10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार आहे. सीरम इन्स्टिट्युट आणि गावी (Global Alliance for Vaccines and Immunizations) ही संघटना करोनावरची जी लस तयार करणार आहे त्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत. मंगळवारी या संदर्भातली घोषणा सीरमने केली आहे. या लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असणार आहे. 10 कोटी डोस तयार करण्याच्या प्रक्रियेला ही फाऊंडेशन गती देईल. भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पाृदक कंपनी आहे. करोनाचा फैलाव रोखणार्‍या लशीच्या निर्मिती संदर्भात सिरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर जगातील वेगवेगळया लस संशोधन करणार्‍या संस्थांबरोबर करार केले आहेत. सध्या भारतात सिरमकडून ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. सिरमने अस्त्राझेनेकाप्रमाणेच अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com