करोना लस
करोना लस
देश-विदेश

करोना लसीबाबत ही आहे GOOD NEWS

पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटला मंजुरी

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई

पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोरोनाविरोधी लस corona vaccine कोव्हीशील्डच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्विनिकल ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. भारतात ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने तयार होत आहे. पुण्यातील सिरम इंस्टिट्युट प्रति मिनिट ५०० व्हॅक्सिन डोस तयार केले जातील असे वृत्त आहे. डीसीजीआय (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया)ने ही लस तयार करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती करत आहे सिरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. रशिया ही प्रायोगिक करोना लसीच्या ३ कोटी डोसची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर या लसीचे १७ कोटी डोस परदेशात बनविण्यात येणार आहे. मॉडर्नना इंक या अमेरिकन कंपनीची करोना लस पहिल्या चाचणीत यशस्वी झाली होती. ४५ निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले निकाल आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com