Good News : करोनाची दुसरी लाट ओसरतेय ; ‘ही’ आहेत दहा कारणे

Good News : करोनाची दुसरी लाट ओसरतेय ; ‘ही’ आहेत दहा कारणे

नवी दिल्ली - करोनाला रोखण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा परिणाम होताना दिसत आहे.

केंद्र सरकराने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणासह 18 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. 10 कारणांमुळे करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत.

1) 61 दिवसांत पहिल्यांदाच करोनामुक्त रुग्णांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक

देशात 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजार 16ने कमी झाली आहे. ज्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन मंगळवारी 37 लाख 15 हजार 221 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 61 दिवसांत पहिल्यांदा असे झाले आहे की, करोनामुक्त होणारी संख्या नव्या करोनाबाधितांपेक्षा अधिक आहे.

2) 17 राज्यांमध्ये 50 हजारपेक्षा कमी सक्रिय रुग्ण

केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 1 कोटी 90 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आता 37 लाख 15 हजार सक्रिय रुग्ण आहेत. 17 राज्यांमध्ये 50 हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण असून फक्त 13 राज्यांमध्ये 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

3) देशातील मोठ्या शहरांत करोनाचा प्रादुर्भाव कमी

देशातील प्रमुख शहरांमधून करोनाबाबत दिलासादायक बाब समोर येत आहेत, कारण तिथे करोना प्रादुर्भाव कमी होतोना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात लखनऊ, कानपूर, वाराणसी, भोपाळ, पटना, रांची पुणे आणि सूरतमध्ये करोना संसर्गाचा दर कमी झाला आहे.

4) करोना संसर्ग दरात घट होणार्‍या जिल्ह्यात वाढ

देशात 15 ते 21 एप्रिल दरम्यान करोना संसर्ग दरात घट झालेल्या जिल्ह्यांची संख्या 73 झाली आहे. तर 29 एप्रिल ते 5 मेपर्यंत या जिल्ह्यांची संख्या वाढून 182 इतकी झाली आहे.

5) महिन्याभरात पॉझिटिव्हीटी रेट 70 टक्क्यांवरून 23 टक्क्यांवर

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने लॉकडाऊनचा फायदा झाल्याचे बोलत पुण्याचे उदाहरण दिले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणाले की, कठोर कंटेनमेंट झोनचा फायदा होत आहे. जर पुण्याकडे पाहिले तर मार्च महिन्यात येथे पॉझिटिव्हीटी रेट 69.7 टक्के होता. तर आता 23 टक्क्यांवर आला आहे.

6) महाराष्ट्र, उत्तरप्रदेशात नव्या बाधित प्रकरणात घट

केंद्र सरकारच्या माहिनीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगढसह 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दैनंदिन नोंद होणार्‍या नव्या करोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे.

7) दिल्लीत करोनाचा वेग होतोय कमी

दिल्लीत आता करोनाबाधितांप्रमाणे सक्रिय रुग्ण कमी होत आहेत. गेल्या 24 दिवसांमध्ये राजधानी दिल्ली 7 हजार 226 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. मंगळवारी दिल्लीत 12 हजार 481 नवे करोनाबाधित आढळले. तर 347 जणांचा मृत्यू झाला असून 13 हजार 583 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. संक्रमण दर 36 टक्क्यांवरून घट होऊन 17.76 टक्क्यांवर पोहोचला आहे.

8) दोन महिन्यांनंतर सक्रिय रुग्णांमध्ये 30 हजार कमी

देशात 3.48 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 205 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात जवळपास दोन महिन्यानंतर सक्रिय रुग्णांमध्ये 30 हजारांहून अधिक घट झाली आहे आणि सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाख 4 हजार 99वर पोहोचली आहे.

9) करोना मृत्यूच्या संख्येत कमी होण्यास सुरुवात

मंगळवारी केंद्र सरकारने म्हटले की, देशात नव्या करोनाबाधितांप्रमाणे करोना मृत्यूची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हे करोनाची दुसरी लाट हळू हळू मंदावत असल्याचे संकेत आहेत.

10) 14 दिवसांत नवी रुग्णसंख्या 3.29 लाख

केंदीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 14 दिवसांत मंगळवारी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होऊन 3.29 लाख झाली. देशातील आता एकूण करोनाबाधितांची संख्या 2 कोटी 33 लाख 40 हजार 938वर पोहोचली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com