भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात भीषण अपघात, थरारक Video कॅमेऱ्यात कैद

भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात भीषण अपघात, थरारक Video कॅमेऱ्यात कैद

दिल्ली | Delhi

अनेकदा तुम्हाला बाईक किंवा कार चालवत असताना भटके कुत्रे मागे लागल्याचा अनुभव आला असेल. कुत्रे भुंकायला लागतात आणि वाहनाच्या मागे धावतात. तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने जात असताना अनेकदा असं होते की कुत्री तुमच्या गाडीच्या मागे धावतात. जोरजोराने भुंकतात.

यामुळे अनेकदा चालकाचं नियंत्रण सुटण्याची शक्यता असते किंवा कुत्रं भुंकल्याने चालकाचे लक्षही विचलित होण्याची शक्यता असते. यामुळे अपघातदेखील होतात. अशावेळी त्यांच्याकडे लक्ष न देणं केव्हाही योग्य असं वारंवार सांगूनही पुन्हा तीच घटना समोर आली आहे. कुत्र्यांपासून जीव वाचवण्याच्या नादात भीषण अपघात झाला. दुचाकी उभ्या असलेल्या गाडीवर आदळली आणि तीन जण हवेत उडाले.

भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात भीषण अपघात, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
नगर-कल्याण महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार

ओडिशाच्या बेरहामपूर शहरात ही घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक महिला आपल्या मुलाला शाळेत सोडायला निघाली होती. स्कुटीवर पुढे लहानगा उभा होता तर मागे आणखी एक महिला बसली होती. दरम्यान त्यांच्या स्कुटरचा काही भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करण्यास सुरुवात केली.

भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात भीषण अपघात, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी कनेक्शन, माजी स्वीय सहाय्यकांचा आरोप

चार-पाच कुत्रे एकाच वेळी पाठलाग करत असल्याने भीतीने महिलेने आपल्या स्कुटीचा स्पीड वाढवला. मात्र महिलेचं स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकली. धडकेमुळे मुलासह दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या. गाडी चालवणारी महिला गाडीच्या धडकेनंतर उडून रस्त्यावर पडली. सुदैवाने अपघातानंतर कुत्रे पळून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या संपूर्ण घटनेचा थरार कैद झाला आहे.

भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात भीषण अपघात, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

कुत्रे गाडीच्या मागे का धावतात?

श्वान तज्ज्ञांच्या मते, कुत्रे कोणत्याही वाहनाच्या मागे तुमच्यामुळे धावत नाहीत. वास्तविक, ते गाडीच्या टायरभोवती धावतात, ज्यावर काही कुत्र्याने आपला वास सोडला असतो. वास्तविक, ते इतर कुत्र्यांना आपले शत्रू मानतात आणि जेव्हा त्यांना तुमच्या गाडीच्या टायरमधून दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो तेव्हा ते त्याच्या मागे भुंकत धावतात. कारण कुत्र्यांना वासाची तीव्र भावना असते, ते टायरवर असलेल्या गंधाचा वास घेऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की वास कशाचा आहे? तुमच्या लक्षात आले असेल की काही वेळा कुत्रे तुमच्या गाडीच्या टायरवर लघवी करतात. अशा स्थितीत लघवीचा वास इतर कुत्र्यांना गाडीच्या मागे धावायला भाग पाडतो. गंधामुळे कुत्रे गाडीचा पाठलाग करण्यास आणि तिच्यावर भुंकण्यास उद्युक्त होतात.

भटक्या कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात भीषण अपघात, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
Karnataka : निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका! डीके शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल... प्रकरण काय?

बचाव कसा कराल?

जर तुमच्यासोबत असे काही घडले आणि कुत्रे तुमच्या गाडीवर भुंकत असतील तर तुम्ही घाबरू नका. यावरचा सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग कमी करा. यामुळे काय होईल की, अनेकदा कुत्री असं केल्यावर भुंकणं बंद करतात. तसंच तुमच्यामागे धावणंही बंद करतात. हिंमतीने आपले वाहन थांबवा. तुम्ही पाहाल कुत्री आपोआप शांत झाली असतील. ते शांत झाल्यावर मग हळूहळू तुमच्या वाहनाचा वेग वाढवा आणि या भागातून बाहेर पडा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com