फटाके बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती
फटाके बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्ली l Delhi

कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

काय म्हटलंय कोर्टाने ?

सण महत्त्वाचे आहेत, हे आम्ही समजू शकतो. पण सध्या आयुष्यच धोक्यात आहे. सध्या जीवन वाचवण्यापेक्षा मोठी मूल्ये कोणतीच असू शकत नाही. तसेच कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी पाच नोव्हेंबरला काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रीवरही बंदी घातली. एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com