Samruddhi Express Way Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत केली जाहीर

Samruddhi Express Way Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत केली जाहीर

मुंबई | Mumbai

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Express Way Accident) अपघातांची मालिका सुरुच आहे. मध्यरात्री समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी (12 travellers Dead 20 Injured) आहेत. यात ६ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट (PM Narendra Modi Twitt)करत व्यक्त करत दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

समद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला. या घटनेने मनाला अतिव दु:ख झाले. ज्यांनी आपल्या जवळची माणसे गमावली त्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रर्थना करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएम केअर फंडमधून २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजारांची मदत केली जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.

देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

देवेंद्र फडणीवासांनी ट्वीट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत.

कसा झाला अपघात

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात १२ जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com