पुणे -

भारतात रशियाच्या स्पुटनिक-व्ही या करोना लसीची दुसर्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यात आली आहे. पुण्यातील नोबेल

हॉस्पिटलमध्ये ही चाचणी करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमध्ये 17 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. या सर्वांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

नोबेल रुग्णालयाच्या प्रशासनानं सांगितलं की, लसीच्या क्लिनिकल चाचणीमध्ये ट्रायल प्रोटोकॉलचं पूर्णपणे पालन केलं जात आहे. ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे, त्यांचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

गॅमेलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) हे संयुक्तरित्या स्पुटनिक-5 ही लस तयार करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, भारतानं रशियाकडून या लसीचे 100 मिलियन (10 कोटी) डोस खरेदी केले आहेत.

मानवी चाचणीसाठी 17 तंदुरुस्त स्वयंसेवकांवर गेल्या तीन दिवसांत स्पुटनिक-5 या लसीचे डोस देण्यात आले आहेत. रोगप्रतिबंधक लस टोचण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरु झाली आहे. सर्व स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. या सर्वांना पुढील काही दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती नोबेल रुग्णालयाचे क्लिनिकल रिसर्च विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. राऊत यांनी दिली.