आक्षेपानंतरही रशियात करोना लसीचं उत्पादन
देश-विदेश

आक्षेपानंतरही रशियात करोना लसीचं उत्पादन

जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांचा आक्षेप

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांनी आक्षेप घेतल्यानंतरही रशियाने आपल्या करोनाच्या लसीचे उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या स्पुटनिक - वी या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियन आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात 50 कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. Russia starts production of Covid-19 vaccine

या लसीच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच करोना विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यासदेखील ही लस यशस्वी ठरली असल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं.

ही लस एका व्यक्तीला दोन वेळा देण्यात येते आणि या विषाणूविरोधात दोन वर्षांपर्यंत रोग प्रतिकारक क्षमता विकसित करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यापूर्वी या लसीची 76 स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com