Rules Change from 1st October : उद्यापासून ‘हे’ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार

Rules Change from 1st October : उद्यापासून ‘हे’ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार

मुंबई | Mumbai

सप्टेंबर महिना संपत आला आहे. अवघा एका दिवस उरला आहे. पैशाशी संबंधित अनेक नियम उद्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. तुमच्यासाठी या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला १ ऑक्टोबरपासून होणार्‍या या बदलांची माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. १ ऑक्टोबरपासून काय बदल होणार आहेत जाणून घ्या.

प्रत्येक महिन्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला स्वयंपाकघरातील बजेट मर्यादित असू शकते. तेल विपणन कंपन्या (Oil Marketing Company) दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती सुधारतात आणि यावेळीही ते दिसून येईल. मात्र, ऑक्‍टोबर सुरू होण्यापूर्वीच सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची मोठी कपात केली असली, तरी १ ऑक्टोबर २०२३ रोजीही देशातील जनता त्यांच्या किंमतीतील बदलांवर लक्ष ठेवणार आहे. केंद्राच्या दिलासादायक निर्णयानंतर कंपन्या काय चढ-उतार करतात हे १ ऑक्टोबरपासूनच समजेल. यासोबतच सीएनजी-पीएनजी आणि एअर टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किंमतींमध्येही बदल दिसून येऊ शकतात.

१९ मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती आणि त्या RBI च्या बँका आणि प्रादेशिक कार्यालयांमधून जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाईल. ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. सप्टेंबर २०२३ साठी, जो आज संपत आहे. म्हणजे उद्यापासून या नोटा अजिबात चालणार नाहीत.तसंच, सेंट्रल बँक या नोटा परत करण्याबाबत नवीन अपडेट देखील जारी करू शकते. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण नोटांपैकी ९३ टक्के नोटा परत आल्या होत्या, परंतु असे असूनही, २४,००० कोटी नोटा अजूनही चलनात होत्या. अशा वेळी रिझर्व्ह बँक या नोटा परत करण्याची मुदतही वाढवू शकते किंवा उद्यापासून या नोटा रद्द होऊ शकतात.

देशात उद्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होणार आहे, जो जन्म प्रमाणपत्राशी संबंधित आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (अमेंडमेंट) कायदा २०२३, उद्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होईल. याअंतर्गत आता कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणे, नवीन ड्रायव्हिंग लायसन्स देणे, मतदार यादी तयार करणे, आधार क्रमांक, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीत नियुक्ती करण्यासाठी जन्म प्रमाणपत्राचा वापर करता येणार आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) यांसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना 30 सप्टेंबरपर्यंत त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तपशील सादर करावे लागणार आहेत. सरकारी अधिसूचनेनुसार ही आवश्यकता पूर्ण न करणाऱ्या खात्यांना 1 ऑक्टोबरपासून निलंबनाला सामोरे जावे लागू शकते.

देशात उद्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होणार आहे, जो TCS शी संबंधित आहे. स्रोतावरील कर संकलनाचे नवीन नियम म्हणजेच TCS उद्यापासून लागू होणार आहेत. या नवीन नियमांचा परदेश प्रवासावर होणारा खर्च म्हणजेच व्यवहारांवर परिणाम होणार असल्याचे समजते. परदेशी स्टॉक, म्युच्युअल फंड, परदेशात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठी नियम बदलत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत, एखादी व्यक्ती एका वर्षात २५०,००० डॉलरपर्यंत रक्कम पाठवू शकते. १ ऑक्टोबर २०२३पासून, वैद्यकीय आणि शिक्षणाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी ७ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास २०% TCS लागू होईल. तुम्ही एका आर्थिक वर्षात ७ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी व्यवहार केल्यास हा नियम लागू होणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com