तृणमूलच्या सदस्यांनी कृषी विधेयक राज्यसभेत फाडले

तृणमूलच्या सदस्यांनी कृषी विधेयक राज्यसभेत फाडले

नवी दिल्ली

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी रविवारी राज्यसभेत दोन शेतकरी आणि उत्पादन व्यापार व वाणिज्य (पदोन्नती आणि सुलभता) विधेयक आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) करारनामा सादर केला. या विधेयकावर चर्चा सुरु असतांना मोठा गदारोळ झाला.

विधेयक मांडताना नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, दोन्ही बिले ऐतिहासिक आहेत, ते शेतकर्‍यांचे जीवन बदलतील. शेतकरी देशभर कुठेही धान्य विकू शकतील. मी त्यांना विश्वास देतो की, बिलांचा संबंध किमान समर्थन किंमत (एमएसपी)शी नाही.

दुसरीकडे कॉंग्रेस, तृणमूल काँग्रेस, आपने व लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने कृषी विधेयकाचा कडाडून विरोध केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही विधेयकावरून सरकारला धारेवर धरत काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यावरूनही राऊत यांनी मोदींना टोला लगावला. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का?

दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी या विधेयकावरुन सर्व नियम तोडत सभापतींच्या आसनाजवळ गेले. त्यांनी विधेयकाच्या प्रती फाडून टाकल्या. गोंधळामुळे सभापतींनी राज्यसभेचे कामकाज का तहकूब केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com