अशी आहे मुकेश अंबानींची नवी कोरी ‘रॉल्स रॉयस’ अलिशान कार

किंमत ऐकून थक्क व्हाल; कंपनी बनवते ठराविक लोकांसाठीच या कार्स
अशी आहे मुकेश अंबानींची नवी कोरी ‘रॉल्स रॉयस’ अलिशान कार

मुंबई | Mumbai

रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambai) यांच्या ताफ्यात आणखी एका महागड्या गाडीची भर पसली आहे. अंबानी यांनी रोल्स रॉयस हॅचबॅक (Rolls Royce hatchback) गाडी नुकतीच खरेदी केलेली आहे....

या गाडीची किंमत (Car price) तब्बल १३.१४ कोटी इतकी आहे. आरटीओच्या माहितीनुसार, ही गाडी भारतातील खरेदी करण्यात आलेल्या सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. गाडीच्या मॉडलचे नाव रॉल्स रॉयस कलिनन (Rolls Royce Cullinan) आहे.

रॉल्स रॉयस कलिनन पेट्रोल मॉडल कारला आरआयएल (RIL) ने ३१ जानेवारी रोजी दक्षिण मुंबईच्या ताडदेव रिझनल ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये रजिस्टर करण्यात आले होते. २०१८ मध्ये लाँचिंगच्या वेळी या गाडीची बेस किंमत ६.९५ कोटी रुपये होती. कस्टमाइज्ड मॉडिफिकेशनमुळे (Customized modifications) या गाडीची किंमत वाढली आहे.

या गाडीचे वजन २.५ टन हून आहे. गाडीसाठी 'टस्कन सन' (tuscun sun) रंगाची निवड करण्यात आली आहे. यात १२ सिलिंडर आणि ५६४ बीएचपीचे पॉवरचे इंजिन आहे. गाडीसाठी खास नंबर प्लेटदेखील निवडण्यात आलेली आहे.

गाडीची नोंदणी ३० जानेवारी २०३७ पर्यंत वैध असेल. रजिस्ट्रेशनसाठी आरआयएलने २० लाखांचा टॅक्स (Tax) भरला आहे. तर रोड सेफ्टी टॅक्स (Road safety tax) म्हणून ४० हजार रुपयांचे रक्कम भरण्यात आलेली आहे.

दरम्यान, या नव्याकोऱ्या गाडीसाठी एक व्हीआयपी नंबर घेण्यात आला आहे. नंबरसाठी तब्बल १२ लाख रुपये मोजण्यात आले आहेत. कारचा नंबर 0001 आहे.

रोल्स रॉयस कंपनी ही जगातील सर्वात महागड्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी अत्यंत लोकप्रिय आहेच मात्र कंपनीसोबत आपल्या धोरणांमुळे अनेकदा किस्सेदेखील घडले आहेत. त्यापैकीच हा एक किस्सा....

या गाडीबाबत अनेक किस्से प्रचलित आहेत. त्यापैकी एक असा की 1920 सालादरम्यान एक राजे लंडनमध्ये राहात होते. त्यांना रोल्स रॉयस (Rolls Royce) गाडीचे अलिशान शोरुम दिसले. महाराजा यांची वेशभूषा अगदी साधी असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून कोणीतरी सामान्य भारतीय नागरिक गाडी पहायला आल्याचे शोरूममधील कर्मचाऱ्याला वाटले.

महाराजा म्हणाले की, मला ही गाडी खरेदी करायची आहे. त्यावर शोरूममधील कर्मचारी म्हणाला की, ही गाडी तुमच्यासारख्या माणसांसाठी नाही असे बोलून कर्मचार्याने महाराजांना हाकलवून लावले. त्याकाळात कंपनी केवळ आपली गाडी घरंदाज आणि अति प्रतिष्ठित लोकांनाच विकत असे.

त्यानंतर महाराजांनी हॉटेलवर आले. त्यांनी आपल्या नोकरांना सांगितले की, रोल्स रॉयस कंपनीच्या शोरुमला फोन करुन महाराजांना गाडी पाहायची आहे. शोरुममध्ये महाराजा येणार म्हणून रेड कार्पेट टाकण्यात आले. महाराजा शोरुममध्ये गेल्यावर त्यांचे जोरात स्वागत करण्यात आले.

महाराजांनी सहा गाड्या खरेदी केल्या, भारतात पोहोचविण्याचे पैसेदेखील भरले. महाराजांनी भारतात आल्यावर त्या सहाही गाड्या नगरपालिकेच्या हवाली केल्या आणि शहराच्या कचरा उचलण्यासाठी लावल्या. ही बातमी संपूर्ण जगभरात पोहोचली.

त्यानंतर अमेरिका (America) आणि युरोपात (Europe) प्रचंड लोकप्रिय असलेल्या कंपनीची गाडी भारतात कचरा उचलते, असे समजल्यावर नागरिकांनी ती गाडी घेणेच बंद केले. कंपनीचा खप कमी झाला, कंपनीचे शेअर पडले. कंपनीचे संचालक चिंतेत आले नंतर त्यांनी महाराजांना भेटून त्यांची माफी मागितली. त्यामुळे महराजांनी रोल्स रॉयस गाडीमधून कचरा उचलण्याचे काम बंद करण्याचे आदेश दिले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com