रिचर्ड ब्रॅन्सन यांची अंतराळ सफर यशस्वी ; आता सर्वांना घेता येणार अंतराळात झेप

टीममध्ये भारताच्या सिरिशा बांदलाचाही समावेश
रिचर्ड ब्रॅन्सन यांची अंतराळ सफर यशस्वी ; आता सर्वांना घेता येणार अंतराळात झेप
फोटो - दैनिक भास्कर

मेक्सिको / Mexico- अमेरिकन अंतराळ यान कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकचे संस्थापक आणि कोट्यधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी पाहिलेलं सामान्यांसाठीच्या अंतराळ सफरीचं स्वप्न पूर्ण झाले असून त्यांची पहिली अंतराळ सफर यशस्वी झाली आहे. न्यू मेक्सिकोमधील स्पेस पोर्टमधून 5 जणांना घेवून झेपावलेले रॉकेट अंतराळात एक तासाचा प्रवास करुन परतले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं रॉकेट अंतराळात झेपावले होते. 17 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे यश मिळाले असल्याचेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे या टीममध्ये मूळच्या भारतीय सिरिशा बांदला हिचाही सहभाग असून कल्पना चावलांनंतर अंतराळात झेपावणारी ती पहिली महिला ठरली आहे. दरम्यान, आजचा अंतराळ सफ़र हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सांगितले आहे.

फोटो - दैनिक भास्कर
फोटो - दैनिक भास्कर

उड्डाणापूर्वीचे उद्गार

रॉकेट अंतराळात झेपावण्यापूर्वी ब्रॅन्सन यांनी त्यांच्या मिशन स्टेटमेंटचा पुनरुच्चार केला. तुमची आणि माझी मुलं आणि नातवंडं या सगळ्यांचं अंतराळ सफरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी चाललो आहे, असं ते म्हणाले. हा सोहळा पाहण्यासाठी टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनीही हजेरी लावली होती. टेस्ला कंपनीदेखील अंतराळ व्यवहारांशी संबंधित क्षेत्रात असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाल्याचा मोठा आनंद वाटत असल्याचं मस्क यांनी म्हटलंय.

फोटो - दैनिक भास्कर
फोटो - दैनिक भास्कर

भारताच्या सिरिशा बांदलाचाही सहभाग

रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासोबत रॉकेटमध्ये असणार्‍या टीममध्ये मूळ भारतीय असणार्‍या सिरिशा बांदला यांचाही समावेश आहे. रॉकेटतील 5 जणांच्या टीममधून अंतराळात झेपावणारी सिरीशा बांदला ही कल्पना चावलानंतरची दुसरी भारतीय महिला ठरली आहे. 34 वर्षांची सिरिशा ही एअरॉनॉटिकल इंजिनिअर आहे. हा प्रवास एकूण 2.5 तासांचा असून हे रॉकेट 90 ते 100 किलोमीटर वर जाणार आहे. न्यू मेक्सिकोमधील स्पेस पोर्टमधून हे रॉकेट झेपावले होते.

फोटो - दैनिक भास्कर
फोटो - दैनिक भास्कर

कमर्शिअल अंतराळ सफरींना होणार सुरुवात

व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक आणि कोट्यधीश रिचर्ड ब्रॅन्सन हे त्यांच्या कंपनीनं तयार केलेल्या रॉकेटमधून अंतराळाच्या पहिल्या सफरीसाठी झेपावण्यापूर्वी ‘ही सफर यशस्वी पार पडली, तर कंपनीमार्फत कमर्शिअल अंतराळ सफरींना सुरुवात केली जाईल’ अशी घोषणा ब्रॅन्सन यांनी केली होती.

फोटो - दैनिक भास्कर
फोटो - दैनिक भास्कर
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com