दोन हजार रुपयांची नोट होणार बंद?

नवीन छपाई नाही | रिझर्व्ह बँक अहवाल
दोन हजार रुपयांची नोट होणार बंद?

मुंबई | Mumbai -

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची एकही नवी नोट छापलेली नाही. त्यामुळे आता ही नोट चलनातून बाद होणार का? अशी चर्चा सुरू आहे. Rs 2000 currency note

गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची एकही नोट छापली नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालामधून समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत 5 हजार 512 लाख दोन हजार रुपयांच्या नोटांचे वितरण कमी झाले आहे. मूल्यात्मक विचार केल्यास 2018 मध्ये एकूण नोटांच्या 37.3 टक्के म्हणजेच सहा लाख 72 हजार 642 कोटी रुपयांच्या मूल्याच्या 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. मार्च 2020 मध्ये हे प्रमाण घटून पाच लाख 47 हजार 952 कोटी रुपये एवढे झाले. म्हणजेच गेल्या दोन वर्षांमध्ये 110,247 कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे सर्क्युलेशन कमी झाले आहे.

मात्र एकीकडे दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी होत असले तरी 200 आणि 500 रुपयांच्या नोटांना असलेली मागणी वाढली आहे. 2018 मध्ये 37 हजार 053 कोटी रुपये मूल्याच्या 200 कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. हे प्रमाण मार्च 2020 पर्यंत 1 लाख 07 हजार 293 कोटी रुपये मूल्यापर्यंत पोहोचले आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत चलनामधील नव्या नोटांचे प्रमाण वाढले असले तरी बनावट नोटांचे प्रमाणही तितक्याच वेगाने वाढत आहे. 2019-20 या वर्षांमध्ये पकडण्यात आलेल्या बनावट नोटांपैकी 4.6 टक्के नोटाह्या आरबीआय स्तरावर तर 95.4 टक्के नोटा अन्य बँकांच्या स्तरावर पकडल्या गेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 10, 50, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. तर दोन हजारांच्या बनावट नोटांचे प्रमाम 21 हजार 847 वरून 17 हजार 020 पर्यंत खाली आले आहे. Reserve Bank of India Rs 2,000 notes were not printed in financial year 2019-20

दरम्यान, 2016 मध्ये घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर चलनात असलेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली गेली होती. मात्र मात्र किरकोळ व्यवहारांसाठी ही नोट तेव्हापासून सर्वसामान्यांसाठी अडचणीची ठरत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com