उत्तराखंडची टोपी, मणिपूरचा गमछा! प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा नवा लुक चर्चेत

उत्तराखंडची टोपी, मणिपूरचा गमछा! प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा नवा लुक चर्चेत

दिल्ली | Delhi

भारतात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन विशेष असा असणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर ते राजपथावरील कार्यक्रमासाठी दाखल झाले. राजपथावर पथसंचलनामध्ये विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ सादर करण्यात आले. हा दिमाखदार सोहळा सुरू असतानाच मात्र एकाच चर्चा गोष्टीची वारंवार होत होती. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी घातलेली टोपी आणि गमछा. पंतप्रधान मोदींच्या या खास पेहरावाची (PM Modi Costume) सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली होती. या टोपीवर ब्रह्मकमळ (Brahmakamal) पाहायला मिळत आहे. ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये (Manipur) वापरत असलेला गमछा घातला होता. नरेंद्र मोदी यांनी यंदा पांढऱ्या कुर्त्यावर ग्रे रंगाचं जॅकेट परिधान केलं होत.

दरम्यान, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका (assembly election 2022) डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी तेथील पारंपारिक पोशाखाची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निवड केल्याचं पाहायला मिळालं आहे.

Related Stories

No stories found.