धोका टळला! चीनचे 'ते' अनियंत्रित रॉकेट अखेर कोसळले

'या' ठिकाणी कोसळले रॉकेट
धोका टळला! चीनचे 'ते' अनियंत्रित रॉकेट अखेर कोसळले

दिल्ली l Delhi

चीनचे सर्वात मोठ्या रॉकेट लाँग मार्च ५ बी (Long March 5B) ८ मे रोजी पृथ्वीवर धडकणार होते. मात्र ते पृथ्वीवर नेमके कोठे कोसळणार याचा अंदाज नसल्याने सर्वत्र चितेंचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र काही वेळापूर्वीच हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले. या रॉकेटचे बहुतांश अवशेष पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच नष्ट झाले आहे. यामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.

१०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असणारे हे रॉकेट दक्षिणपूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरेबियन बेट, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनिझुएला, दक्षिण युरोप, दक्षिण-मध्य आफ्रिका, दक्षिण भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क, माद्रिद, दक्षिण चिली, वेलिंग्टन, न्यूझिलंडच्या भागात हे रॉकेट कोसळेल, असा तज्ञांचा कयास होता.

अखेर रविवारी सकाळी हे रॉकेट भारताच्या दक्षिण पश्चिम दिशेला असलेल्या मालदीव बेटांच्या पूर्वेला हिंद महासागरात कोसळले. पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रवेश करताच या रॉकेटचा मोठा भाग जळून खाक झाला आणि इतर भाग महासागरामध्ये कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चीनने २८ एप्रिलला तियानहे स्पेस स्टेशन बनवण्यासाठी सगळ्यात मोठे रॉकेट ५बी अवकाशात सोडले होते. एक मॉड्यूल घेऊन हे रॉकेट स्पेस स्टेशनमध्ये गेले. मॉड्यूलला निर्धारित कक्षेत सोडण्यात आल्यानंतर याला नियंत्रित पद्धतीने जमिनीवर यायचं होतं. पण, चीनच्या स्पेस एजेन्सीचं या रॉकेटवरील नियंत्रण सुटले.

चीनचं एखादं रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२०मध्ये दुसऱ्या एका लॉंग मार्च रॉकेटचे अवशेष पश्चिम अफ्रिकन देशातील आयव्हरी कोस्ट येथील गावांमध्ये कोसळलं होतं. यामुळे या ठिकाणी मोठं नुकसानं झालं होतं.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com