'रेमडेसिवीर'बाबत WHO चा मोठा दावा!

'रेमडेसिवीर'बाबत WHO चा मोठा दावा!
WHO

दिल्ली | Delhi

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

यावेळी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं रेमडेसिवीर इंजेक्शनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर करोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी वृत्तमाध्यमांना माहिती दिली आहे. त्यांनी म्हंटल आहे की, 'पाच वैद्यकीय चाचण्याच्या आधारे असं दिसून आलं की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरात घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधी घट झाली. तसंच आजारांवरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचं दिसून आलं नाही.'

तसेच, 'आम्ही सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र, सध्या रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्याच्यावर आमचं लक्ष्य आहे.' असंही ते म्हणाले आहे.

काय आहे रेमडेसिवीर?

रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर प्रभावी मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड-19 रुग्णांवरचा प्रभावी उपाय असल्याचं म्हणत याची शिफारस केली होती. सिप्ला (मुंबई), हेट्रो हेल्थकेअर (हैद्राबाद), ज्युबीलियंट लाईफसायंन्सेस (दिल्ली), इलिया लेबोरेटरीज (अर्जेंटीना), डॉ. रेड्डीज (हैद्राबाद), झायडस् कॅडिला (अहमदाबाद) या सहा कंपन्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स महाराष्ट्रात वापरली जात आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com