ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
देश-विदेश

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

केंद्राने मागील 2019-20 गाळप हंगामात ऊसाची एफआरपी न वाढवण्याचा निर्णय घेऊन उसाचे उचित मूल्य(एफआरपी) 275 रुपये प्रति क्विंटल वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

sukhdev fulari

sukhdev fulari

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

केंद्राने मागील 2019-20 गाळप हंगामात ऊसाची एफआरपी (FRP) न वाढवण्याचा निर्णय घेऊन उसाचे उचित मूल्य(एफआरपी) 275 रुपये प्रति क्विंटल वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप होणाऱ्या ऊसाला (10 टक्के साखर उतारा) तोडणी वाहतुकी खर्चासह प्रतिटन 2850 रुपये एफआरपी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऊसाला प्रतिटन 2850 रुपये एफआरपीला केंद्रीय गृह मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गटाची बैठक आज संपन्न झाली. त्यात प्रतिटन 2850 रुपये एफआरपी देण्यास मंजुरी देण्यात आली.आता हा निर्णय अंतिम शिक्का मोरतबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचे अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी जाणार आहे. ऊसाच्या वाढीव एफआरपीला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाची लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

केंद्राने मागील 2019-20 गाळप हंगामात ऊसाची एफआरपी न वाढवण्याचा निर्णय घेऊन उसाचे उचित मूल्य(एफआरपी) 275 रुपये प्रति क्विंटल वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

यावेळी 2020-21 गळीत हंगामासाठीच्या ऊस एफआरपी वाढीस मान्यता मिळाल्यास प्रतिक्विंटल 285 रुपये एफआरपी होऊ शकते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com