१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना करोना लस; कधी व कुठे कराल नोंदणी?

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना करोना लस; कधी व कुठे कराल नोंदणी?

दिल्ली l Delhi

देशात करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. करोना बाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय झाली आहे. करोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

भारतात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या देशात ४५ वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे त्यासाठी २४ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आधीप्रमाणेच CoWin अँपवर ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

कशी कराल नोंदणी?

- प्रथम कोविन पोर्टल www.cowin.gov.in ला भेट द्या.

- येथे गेल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करा.

- लॉगिन केल्यानंतर महत्वाची तुम्हाला येथे माहिती द्यावी लागणार आहे.

- आता तुम्हाला तुमच्या घराजवळील लसीकरण केंद्रावर लस कधी घ्यायची हे ठरवता येणार आहे.

- ज्या दिवशी आणि वेळी तुम्हाला लस घ्यायची आहे तेव्हा लसीकरण केंद्रावर उपस्थितीत रहा.

- नागरिकांना स्वत:सह अन्य तीन जणांची नोंदणी करता येणार आहे. त्याचसोबत शेड्युल करण्यात आलेली नोंदणी तुम्ही रद्द सुद्धा करु शकता.

कशी असेल प्रक्रिया?

नोंदणी केलेल्या व्यक्तीला त्यांच्या मोबाईक क्रमांकावर एक SMS येईल. पहिला मेसेज येईल तेव्हा व्यक्तीला रजिस्ट्रेशन कंन्फर्मेशन बद्दल सांगण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या मेसेजमध्ये कंन्फर्म तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राबद्दल कळवले जाईल. आता लस घेतल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस त्या संदर्भातील एसएमएस तुम्हाला मिळेल. पहिला डोस घेतल्यानंतर ३० मिनिटे तुम्हाला निगराणीखाली ठेवले जाईल.

आधार कार्डाशिवाय लस घेता येईल का?

होय, लसीकरण करण्यासाठी तुम्हाला कोविन अँपवर आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची पुर्तता करावी लागणार आहे.

नोंदणीसाठी शुल्क मोजावे लागतात का?

नाही. नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारे शुल्क घेतले जात नाहीत.

लसीकरण शुल्क किती?

गेल्या काही दिवसांमधअये केरळ, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप तो निर्णय घेण्यात आलेला नाही. बुधवारी सिरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १ मेपासून राज्य सरकारांना कोविशिल्ड लसीचा प्रत्येक डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना हेच डोस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दरम्यान, १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये रशियाची स्पुटनिक व्ही ही लस देखील काही लसीकरण केंद्रांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल, असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना सांगितलं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com