खतांच्या किंमती कमी करा ; शरद पवारांचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना पत्र

खतांच्या किंमती कमी करा ; शरद पवारांचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना पत्र

मुंबई - रासायनिक खतांच्या किंमती कमी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्राद्वारे केली आहे. तसंच लॉकडाऊनमुळे शेतकर्‍यांचं आधीच नुकसान झालेलं आहे. त्यामुळे वाढीव खतांच्या किंमती शेतकर्‍यांना परवडणार्‍या नाहीत, असं शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे, आधीच समाज त्रासलेला असताना मदत करण्याऐवजी केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे मार्केटींग व्यवस्थेला फटका बसला आहे. मान्सून अगदी जवळ आला आहे, दुर्दैवाने घेतलेल्या निर्णयामुळे पेरणीपूर्वी होणार्‍या शेतीविषयक कामकाजावर थेट परिणाम होईल आणि भविष्यात पिकांच्या उत्पादन खर्च व उत्पादकतेवर परिणाम होईल,

इंधन दरवाढ असताना खतांच्या किंमती वाढवल्याने शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळल्या सारखे आहे. सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक असून त्वरित मागे घ्यावा, अशी विनंती करत शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांना या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्यास सांगितले आहे. शेतकर्‍यांना दिलासा दिल्यास कौतुकच असेल, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com