दिल्ली | Delhi

करोना संकटाच्या काळात जोरदार आपटी खाल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजारांनी सावरायला सुरुवात केली आणि पूर्वीचे सर्व उच्चांक तोडत नवे उच्चांक प्रस्थापित करायला सुरुवात केली. जागतिक शेअर बाजारातील संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसतो आहे. वेगवेगळ्या जागतिक इंडेक्सप्रमाणेच भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात जोरदार तेजी दिसते आहे.

मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 247 अंकांनी म्हणजे 0.50 टक्क्यांनी उसळुन 49,517 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 78 अंकांनी वाढून 14,563 अंकांवर बंद झाला. आज रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेलची चांगली वाढ नोंदली गेली.

सेन्सेक्समध्ये एसबीआयआज अव्वल फायदा झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने जवळपास 4 टक्के वाढ नोंदविली. याशिवाय भारती एअरटेल (Bharti Airtel), रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयटीसी (ITC), अॅक्सिस बँक (Axis Bank) आणि एनटीपीसी (NTPC) च्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर एशियन पेंट्स (Asian Paints), एचएएन, नेस्ले इंडिया (Nestle India), टायटन (Titan) आणि कोटक बँक (Kotak Bank) यांचा टॉप लूजर्स मध्ये समावेश आहे.

वाहन विक्री वाढली असल्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. त्याचबरोबर कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करतील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीतही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी होत असल्यामुळे निर्देशांकांना भक्कम आधार मिळत आहे. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी 3,138 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जागतिक बाजारातूनही आज कमी अधिक प्रमाणात सकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केली असल्याचे ते म्हणाले.