भारतीय वंशाचे 'अजय बंगा' जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, त्यांचे पुण्याशी आहे खास कनेक्शन

भारतीय वंशाचे 'अजय बंगा' जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, त्यांचे पुण्याशी आहे खास कनेक्शन

दिल्ली | Delhi

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी गुरुवारी मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO of Mastercard) अजय बंगा (Ajay Banga) यांना जागतिक बँकेच्या (World Bank) प्रमुखपदासाठी नॉमिनेट केले. भारतीय मूळ असलेले अजय बंगा हे जागतिक बँकेचे आगामी प्रमुख असू शकतात. यापुर्वी डेव्हिड मालपास हे जागतिक बँकेचे प्रमुख होते.

जागतिक बँकेमध्ये अमेरिकेची हिस्सेदारी अधिक असल्यामुळे सर्वसाधारणपणे तेथील प्रशासनाने शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होण्याचा प्रघात आहे. असे असल्याने बंगा यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

भारतीय वंशाचे 'अजय बंगा' जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, त्यांचे पुण्याशी आहे खास कनेक्शन
धक्कादायक! लुटारूंनी पिस्तुलातून गोळ्या घालून एकाला ठार मारले

जागतिक बँकेच्या संचालक मंडळाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन जागतिक संस्थांपैकी एकीच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. यापैकी जागतिक बँकेमध्ये अमेरिका तर नाणेनिधीमध्ये युरोपातील व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षपदी असते.

अजय बंगा हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन मिळाले आहे. बंगा यांचे पूर्ण नाव अजयपाल सिंग बंगा आहे. अजय सध्या 'जनरल अटलांटिक'चे उपाध्यक्ष आहेत. ही संस्था जगातील सर्वात मोठ्या खाजगी इक्विटी फर्मपैकी एक आहे.

भारतीय वंशाचे 'अजय बंगा' जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, त्यांचे पुण्याशी आहे खास कनेक्शन
ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात, ११ ठार

याआधी ते क्रेडिट कार्ड कंपनी असलेल्या मास्टरकार्डचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ होते. अजय बंगा यांना अर्थकारण व्यवसायाचा सुमारे ३० वर्षांचा अनुभव आहे. मास्टरकार्ड या कंपनीत त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या आहेत. याशिवाय त्यांनी अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंकच्या संचालक मंडळातही काम केले आहे.

भारतीय वंशाचे 'अजय बंगा' जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, त्यांचे पुण्याशी आहे खास कनेक्शन
तुम्हाला माहिती आहे का? 'स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

६४ वर्षीय बंगा यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथील सैनी या शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल असून ते पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते. त्यांचे मूळ कुटंब पंजाबमधील जालंधरचे आहे. अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी IIM अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले. भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

भारतीय वंशाचे 'अजय बंगा' जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, त्यांचे पुण्याशी आहे खास कनेक्शन
संतापजनक! ६५ वर्षाच्या वृद्धाचा दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com