आरसीबीसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान

आरसीबीसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान

मुंबई | आयपीएल २०२१ मध्ये आज गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ७:३० वाजता स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. आरसीबी संघाने यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. चेन्नई येथे झालेल्या तिन्ही लढती आरसीबीने जिंकल्या आहेत. आरसीबी गुणतालिकेत ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता राजस्थान रॉयल्स संघावर मात करून विजयी चौकार मारण्यासाठी आरसीबी सज्ज आहे...

राजस्थान रॉयल्स संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. या सामन्यातील विजयाने त्यांना स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्याची संधी मिळणार आहे . राजस्थान संघ २ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आरसीबी आणि रॉयल्स आतापर्यंत २३ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात दोन्ही संघांनी १०-१० विजय संपादन केले आहेत. तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. आरसीबीवर मात करून अंतिम ४ संघांमध्ये झेप घेण्याचा राजस्थान संघाचा इरादा आहे.

आरसीबी संघाबद्दल सांगायचे झाले तर ग्लेन मॅक्सवेल आणि अब्राहाम डिव्हिलिअर्स चांगल्या फॉर्मात आहेत .त्यांनी केकेआरविरुद्ध निर्णायक भागीदारी रचून आपल्या झुंजार अर्धशतकाच्या बळावर आरसीबीला २०५ धावसंख्या उभारून दिली होती. या दोन्ही महत्वपूर्ण खेळाडूंना रोखण्याचे आव्हान राजस्थान संघासमोर असणार आहे.

गोलंदाजीत युझवेन्द्र चहल , हर्षल पटेल आणि मोहंमद सिराज फॉर्मात आहेत . त्यांना आपला फॉर्म असाच कायम ठेवण्याची संधी मिळणार आहे. तर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिलकल यांच्यावर संघाला उत्तम सुरुवात करून देण्याची संधी आहे.

राजस्थान रॉयल्स संघात मनन वोहराच्या जागी डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे . तसेच सलामीवीर जोस बटलर याने चेन्नईविरुद्ध ४९ धावांची खेळी करून आपल्याला फॉर्म गवसला असल्याचे संकेत दिले आहेत. कर्णधार संजू सॅमसन पंजाबविरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर मागील २ सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. त्याच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

शिवाय दिल्लीविरुद्ध लढतीत क्रिस मॉरीस आणि डेविड मिलर यांनी निर्णायक भागीदारी रचून संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र चेन्नईविरुद्ध हे दोघेही संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले होते. त्यांच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे. गोलंदाजीत जयदेव उनाडकट , चेतन सकारिया चांगली गोलंदाजी करत असून, त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.

राजस्थान रॉयल्स संघाच्या फलंदाजीची मदार यशस्वी जयस्वाल , मनन वोहरा , जोस बटलर , संजू सॅमसन , डेविड मिलर , रियन पराग , लियम लिंगविस्टोन , अनुज रावत यांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये क्रिस मॉरीस , राहुल टेवटिया , महिपाल लोमरोर , शिवम दुबे आहेत. गोलंदाजीत अँड्रू टाय , कार्तिक त्यागी , जयदेव उनाडकट , चेतन सकारिया , मुस्तफिजूर रहेमान , केसी करिअप्पा , कुलदीप यादव , आकाशसिंग आहेत.

बंगळूर संघाच्या फलंदाजीची मदार रजत पतिदार . देवदूत पडिकल , विराट कोहली , अब्राहाम डिव्हिलिअर्स , सचिन बेबी , सीकर भरत , मोहंमद अझरुद्दीन, फिन अलेन , सुयश प्रभुदेसाई आहेत अष्टपैलूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल , डॅनिअल ख्रिश्चन , शहाबाज अहमद , वॉशींग्टन सुंदर , पवन देशपांडे , आहेत गोलंदाजीत मोहंमद सिराज , नवदीप सैनी , युझवेन्द्र चाहल , ऍडम झाम्पा , केन रिचडसन , हर्षल पटेल , कायले जेमिसन आहेत

सलिल परांजपे नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com